Monday, January 25, 2010

ती...!!!!

तुला आठवायचं म्हंटल कि , आधी स्वतः विसरावं लागतं,
मनाला तुझ्याशी झिजवून , थोडं मनासाठी उरावं लागतं...!!!!

मी केलेली प्रेमाची व्याक्खा , पुरेपूर निरर्थक होती,
मी जिथं कोमेजलो तिथ , तू उमलणार होती...!!!!

नाव माझं नसला तरी , आठवण माझी राहणार होती,
नजरे तून तुझी, दुनिया मलाच दिसणार होती...!!!!

जिच्यासाठी लिहितोय, तीच मला सापडत नाही
हितगुज बोलून मोकळे व्हावं , असे मनाच मला सापडत नाही...!!!!

शब्दांना मग अशावेळी का काव्याचा फुटतो झरा ,
तिलाच आठवत जीव होऊ लागतो कावरा बावरा... !!!!

अशा वेळी काय करावे, ते उमजतच नाही,
आठवणींच्या राज्यातून मन दूर लोटतच नाही...!!!!

क्षणा क्षणाला वाढतच जाते , अशी हि थारार्ता,
झोप नकोशी वाटते , अशी हि अगतिकता...!!!!